Posts

Showing posts from September, 2019
वंचितचं संचित २०१४ ह्या वर्षात भारतात जीएसएटी 14 हा उपग्रह, अग्नी मिसाईल, मंगळयान, माळीन दुर्घटना, आंध्रप्रदेशची विभागणी, उरी हल्ला, कॉमनवेल्थ गेम्स, इबोला रोग आणि वाजपेयींना भारतरत्न अशा विविध अंगी घटना घडल्या. पण  २०१४ म्हटलं की पहिली छटा ज्यांची येते ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि निसंदिग्धपणे यायला पण हवी. कारण, एकविसाव्या शतकातील भारतीय राजकारण खऱ्या अर्थाने ढवळून काढणारे हेच ते वर्ष ज्यात 'मोदी' नावाच्या वादळाने भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मित्र पक्षांना तीनशेहून अधिक जागा मिळवून दिल्या होत्या. आता ह्या वादळात राजकीय विरोधकांची धुळदान साहजिक होती. सव्वाशे वर्षं जुना काँग्रेस अवघ्या ४४ लोकसभा क्षेत्रात आपलं अस्तित्व राखू शकला.सपा, बसपा, राजद,तृणमूल, राषट्रवादी काँगेस, डी एम के वगैरे आपलं नावापुरता यश मिळवता आलं. याचाच अर्थ विरोधकांना नाकारून जनतेने मोदींना निवडलं होतं.मोदीसुद्धा आपली ५६ इंचाची छाती आणि त्यावर लाखमोलाचा कोट चढवून नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कर यांसारखे बरेच तडाखेबाज निर्णय घेत होते (तूर्तास या निर्णयातील बरकाव्यात न गेलेलंच बरं). विरोधकांमध्ये अाधीच एकीचा...